मुंबई :- (वृत्तसंस्था)राज्यात 2015 ते 2018 या चार वर्षांत तब्बल 12 हजार 21 शेतकऱ्यांनी दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती बुधवारी राज्य सरकारच्या वतीने विधान परिषदेत देण्यात आली.या आत्महत्यांपैकी 6 हजार 888 प्रकरणे जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरली असून त्यापैकी 6 हजार 845 प्रकरणांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे सरकारने सांगितले.सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन आणि सन्मान योजना राबवली होती. असे असतानाही गेल्या 4 वर्षांत शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, बोंडअळी प्रादुर्भावामुळे बाधित शेतकरी वर्ग, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे 12 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.मराठवाडय़ातील संभाजीनगर, जालना, धाराशीव, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यात 4 हजार 124 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या.त्यापैकी एकटय़ा नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात 94 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर केवळ 34 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळाली.तर 8 प्रकरणे अद्यापी प्रलंबित आहेत. याकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विविध सदस्यांनी लक्ष वेधले. याला मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी लेखी उत्तर दिले.अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments