top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

३ रुग्णांना रस्त्यावर फेकले ; दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा एका रुग्णाचा मृत्यू


मिरज ( सांगली ) :(वृत्तसंस्था) मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला . रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर व सफाई कर्मचारी सागर साळोखे अशी त्यांची नावे आहेत . नरसिंगकर यांना पोलिसांनी अटक केली आहे . शंकर शिंदे , पीरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे या वृद्ध व अत्यवस्थ रुग्णांना उपचार न करता रुग्णालयाबाहेर टाकून दिल्याचा प्रकार २ नोव्हेंबरला उघडकीस आला . सांगलीतील निर्जन जुन्या कुपवाड रस्त्यावर अंधारात तीन अत्यवस्थ रुग्ण पडल्याचे नागरिकांना दिसले . त्यांनी संजयनगर पोलिसांत माहिती देऊन तिघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले . उपचारादरम्यान शिवलिंग कुचनुरे यांचा मृत्यू झाला . यादरम्यान मिरज शासकीय रुग्णालयातून या तिन्ही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात नेत असल्याचे सांगून , सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकल्याचे निष्पन्न झाले रुग्णालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना विनापरवाना बाहेर टाकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध वैद्यकीय अधीक्षक डॉ . दत्ता भोसले यांनी शुक्रवारी रात्री गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली होती .

27 views0 comments

Opmerkingen


bottom of page