चाळीसगांव :- (महेंद्र सूर्यवंशी) दिनांक 26/05/2019 रोजी फिर्यादी राजेंद्र खंडू पवार वय 51 रा.शिवशक्ती नगर टाकळी प्र. चा चाळीसगावं यांची 30000 किमतीची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल क्र. MH19 CP 1992 ही दिनांक 20/5/2019 रोजी रात्री 11 ते दिनांक 21/5/2019 रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाबडीच्या इराद्याने चोरून नेली त्याबाबत चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं 175/2019 भा दं वि क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.चाळीसगांव शहरात होत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपास कामी मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उत्तम कडलग यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूराव भोसले, पोना/अभिमान पाटील,राहुल पाटील,विजय शिंदे,नितीन पाटील,संदीप तहसीलदार,प्रेमसिंग राठोड,पोकॉ प्रवीण सपकाळे,गोपाळ बेलदार,तुकाराम चव्हाण,गोवर्धन बोरसे,राहुल गुंजाळ,संदीप पाटील,भगवान माळी अश्यांचे पथक तयार केले होते.सदर पथक चाळीसगाव शहरात परिसरात आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की चाळीसगाव शहरात नगद रोड मार्केटच्या गेट जवळ एक इसम आपल्या ताब्यात एक हिरो कंपनीचे पॅशन प्रो लाल काळ्या रंगाची मोटारसायकल विना नंबरची कबज्यात बागळून ती विक्री करायची आहे असे सांगून त्यांच्या हालचाली संशयास्पद आहे अशी बातमी मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून मोटारसायकलसह आरोपी नामे जय शरद पवार वय २० राहणार पाट खडकी ता चाळीसगांव यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करिता त्याने सदरचे मोटारसायकल ही नासिक सातपूर येथून चोरून आणली आहे.याबाबत कबुली दिल्याने व त्याच्या चोरी करण्याच्या पद्धतीवरून व त्याच्या कथानावरून व मोघम माहितीच्या आधारे त्यास संशयीत म्हणून वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.त्यास अधिक विचारपूस करता त्याने विंचुर फाटा इथून 1 ,मनमाड रेल्वे पूल येथून 2,नांदगाव रेल्वे स्टेशन वरून 3,जळगाव रेल्वे स्टेशन येथून 1,गिरणा धरण येथून 2,लासलगाव रेल्वे स्टेशन येथून 1 व आठवत नसलेल्या इतर ठिकाणांहून 2, काजगाव येथून 1, नाशिक येथून 1 अश्या एकूण 14 मोटारसायकल तीन लाख चाळीस हजार रुपये किंमतीच्या (४ हिरो स्प्लेनडेर ,1 होंडा शाईन ,1 एच एफ डिलक्स,1 अपची,3 बजाज डिस्कव्हर,२ बजाज पल्याटीना,1 पॅशन प्रो,1 टी व्ही एस स्टार) ह्या चोरून आणून त्या पातोंडा,भामरे,काजगाव,पासर्डी,मजरे,खाजोळा, चाळीसगाव वैगरे ठिकाणी जीम मध्ये ओळख झालेले लोकांना विश्वासात घेऊन अडचण सांगून गहाण ठेवलेल्या होत्या त्या त्याने कडून दिल्याने त्या आता जप्त करण्यात आल्या आहेत.सादर आरोपी यास वरील गुन्ह्यात मा.न्यायालय चाळीसगांव यांच्या कडे हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेत असून त्याकडून अजून मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता आहे.पुढिल तपास पोना/२५२३ अभिमान पाटील हे करीत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments