वृत्तसंस्था:- राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई दि. ७ : राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर हे ३ कोरडे जिल्हे वगळता) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ८२२ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ३ हजार २६१ अनुज्ञप्ती सुरू आहेत. मद्यविक्रीसाठी सशर्त अनुज्ञप्ती दिल्यानंतर आज ७ मे २०२० रोजी अंदाजित १३.८२ लाख लिटर दारु विक्री झाली असून याची किंमत ४८ कोटी १४ लाख रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
➢ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापुर, 8. सांगली, 9. सिंधुदुर्ग, 10. नाशिक, 11. धुळे, 12. जळगाव, 13. नंदुरबार 14. गोंदिया, 15. अकोला, 16. वाशिम 17. बुलढाणा, 18. रत्नागिरी,
➢ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु न केलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. सातारा, 2. औरंगाबाद, 3. जालना, 4. बीड, 5. नांदेड, 6. परभणी, 7. हिंगोली, 8. नागपूर,
➢ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु झाल्या होत्या परंतु पुन्हा अनुज्ञप्तीबंद करण्यात आल्या :- 1. मुंबई शहर, 2. मुंबई उपनगर, 3. उस्मानाबाद, 4. यवतमाळ 5. लातूर.
➢ किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु होण्याची शक्यता असलेले जिल्हे:- 1. भंडारा 2. अमरावती
2.मद्यविक्री सुरु असलेल्या अनुज्ञप्तींची संख्या :- एकूण अनुज्ञप्ती आणि
(कंसात चालू चालू अनुज्ञप्ती)
1.
CL – III (देशीमद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती) 4159 (1199)
2.
FL – II ( वाईन शॅाप ) 1685 (374)
3.
FL BR – II( बीयर शॉप ) 4947 (1687)
4.
FL-W-II ( फक्त वाईन ) 31 (1)
एकूण 10822 (3261)
राज्यात २४ मार्च, २०२० पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि. ६ मे, २०२० रोजी राज्यात ७३ गुन्हे नोंदविण्यात आलेअसून ४३ आरोपींना अटक करण्यात आली असून ९ लाख ९८ हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. २४ मार्च, २०२० पासुन दि. ६ मे, २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ४ हजार ८२९ गुन्हेनोंदविण्यात आले असून २ हजार १०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर ४३८ वाहने जप्त करण्यात आली असून रु.१२.६३ कोटी किंमतीचा एकूणमुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४X७ सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.
Comentários