नाशिक :(वृत्तसंस्था) वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमानिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ' हरिहर भेट ' सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यासाठी शनिवारी कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला . तसेच विविध कार्यक्रम मंदिर परिसरात घेण्यात आले . देवदिवाळी म्हणून कपालेश्वर महादेवाच्या भेटीला सुंदरनारायण मध्यरात्री येत असतात . शंकराला तुलसीदलार्पण आणि विष्णुला बिल्वपत्र अर्पण करण्यात येऊन हा हरिहर भेट सोहळा पूर्ण होतो . या उत्सवाचा प्रारंभ शनिवारी सकाळपासूनच करण्यात आला . उत्सवाचे हे १९ वर्ष आहे . यानिमित्त सकाळी मंदिराच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी रामकुंडावर महादेवाच्या मुकुटास महाअभिषेक करण्यात आला यानंतर पालखी मिरवणूक पंचवटी कारंजावरून मंदिरात आली . मिरवणुकीत सुमारे ५०० ते ६०० भाविकांनी सहभाग घेतला होता . यानंतर रात्री साडे दहा वाजता कपालेश्वर मंदिरात शंकराच्या पिंढीला शृंगार करून महाआरती करण्यात आली . यासाठी महादेवाला पंचामृताचा महाअभिषेक करून शृंगार मुकुट , फुलांची आरास व आराधना करण्यात आली होती . यावेळी मंदिराचे पुजारी अतुल शेवाळे , अनिल भगवान , साहेबराव गाढे , हेमंत गाढे , अविनाश गाढे , कुंदन जगताप आदी उपस्थित होते .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments