(शिरपूर प्रतिनिधी श्री मयूर वैद्य)
शिंदखेडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात विभाग अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची बैठक संपन्न झाली. प्रमुख अतिथी म्हणून विभाग सहसचिव बाबासाहेब श्री श्रीकांत पाठक उपस्थित होते. सुरुवातीला स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ स्व. नानासाहेब बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक प्रा. चंद्रकांत डागा यांनी करून जिल्ह्याच्या कार्य अहवाल सादर केला. शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप दीक्षित , शिरपूर तालुका संघटक प्रा. राकेश मोरे, साखरी तालुका संघटक विलास देसले यांनी आपल्या तालुक्याचे तर दोंडाईच्या शहराध्यक्ष माजी प्रा. डॉ. श्रीराम महाजन यांनी त्यांच्या शहराचा अहवाल सादर केला. बैठकीत नवीन शिंदखेडा तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेल्या रवींद्र ठाकूर व प्रसिद्धी प्रमुख प्रा. भैय्या मंगळे यांचा ज्येष्ठ सदस्य एडवोकेट वसंतराव भामरे व विजया वाघ यांनी सत्कार केले. केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जितेंद्र मेखे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिरपूर तालुक्याचे सदस्य श्री मयुर वैद्य , श्री विपुल कुलकर्णी , श्री राहुल स्वर्ग, श्री विकास आहिरे , श्री ऋषिकेश योगेश जोशी , श्री विजय जयंतीलाल पटेल , श्री संदीप मगन शिरसाठ व कायदे तज्ञ म्हणून एडवोकेट सुहास वैद्य यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र ठाकूर सर व आभारप्रदर्शन प्राध्यापक योगेन्द्र सनेर यांनी केले.
Comments