top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

सप्तश्रृंगीगडावर 29 सप्टेंबरपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ ; उत्सवकाळात खासगी वाहनांना बंदी.


नाशिक -(उपसंपादक ना. वि) येत्या 29 सप्टेंबरपासून आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेच्या नवरात्रौत्सवास सुरुवात होणार आहे . त्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सप्तश्रृंगीगडावर घेण्यात आली . ही बैठक सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ . पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . महाराष्ट्रातल्या देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तश्रृंगीगड हे अर्धपिठ आहे . येथे 29 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे . या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या तयारीची आढावा बैठक घेण्यात आली . ही बैठक सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ . पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली देवी संस्थान कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . नवरात्रौत्सवात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे . त्यानुसार यात्रौत्सव काळात प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत . यात महत्वाचे म्हणजे , नवरात्री उत्सवात बोकडबळीची प्रथा होती . ही प्रथा मागील 5 वर्षांपासून बंद आहे आणि यंदासुद्धा ती बंद ठेवण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे . नागरिकांसाठी पुढील सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे भगवती मंदिरात 84 कॅमेरे बसविण्यात आले असून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे . भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी 21 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शेकडो कर्मचारी सज्ज असणार आहेत . फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून दर तासाला पाच ते सहा फेऱ्यांचे नियोजन करण्याच्या सुचना रोपवे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत . यात्रा काळात खाजगी वाहनांना गडावर बंदी करण्यात आली असून जिल्हा विभागातील 13 आगारांतर्गत 250 बस तर नांदुरी ते सप्तश्रृंगीगड दरम्यान 70 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे . सुरक्षेसाठी अप्पर पोलीस अधीक्षक , दोन उपाधिक्षक , १२ पोलीस निरीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे . भाविकांसाठी सप्तश्रृंगीगड ट्रस्टकडून सहा कोटींचा जनसुरक्षा विमा उतरवण्यात आला आहे . आढावा बैठकीस तहसीलदार बंड कापसे , पोलिस उपाधिक्षक सदाशिव वाघमारे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ . टस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , उपसरपंच राजेश गवळी , संदीप बेनके आदींसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते .

33 views0 comments

Comments


bottom of page