(वृत्तसंस्था) उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण गुरुवारी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले . उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले . साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून ऐतिहासिक संदेश दिला असून ते संस्मरणीय ठरेल , असे या वेळी सांगण्यात आले . बोधचिन्हनिर्मिती करणारे विजयकुमार यादव यांचा या वेळी सन्मान करण्यात आला .बोधचिन्हामध्ये संत गोरा कुंभार यांची हाती चिपळ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली प्रतिमा साकारण्यात आलेली आहे . तसेच संत गोरा कुंभार रचित त्यांच्या साहित्यप्रतिभेची आठवण करून देणाऱ्या म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जगहे करणे शहाणे बापा ' या ओळी लक्ष वेधून घेतात .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments