मुंबई:- सुरक्षेपेक्षा जास्त मायलेज देणारी कार खूप लोकप्रिय होते . यामुळे कार कंपन्याही स्वस्तात मस्त कार बनवून त्या पाण्यासारख्या विकत आहेत . यामुळे रस्ते अपघातात लाखो लोकांचे बळी , जायबंदी होत आहेत . याला कारणीभूत केवळ कार कंपन्या नसून सरकारही तेवढेच आहे . केवळ एक एअरबॅग असलेली कार लाखांमध्ये विकली जाते . कंपन्या लाखो रुपये घेऊन काही हजारात असलेली आणखी एक एअरबॅग का देत नाहीत , असाच मनात विचार येतो . यामागे सरकार आहे . सरकारनेच कमीतकमी एक एअरबॅग असलेल्या गाड्या विकण्याची परवानगी दिली आहे . याचा नियमाचा फायदा कंपन्याही उचलत आहेत . यामुळे चालकाला एअरबॅग असली तरीही त्याच्या बाजुला बसलेल्या व्यक्तीला ही सुरक्षा मिळत नाही . यामुळे अपघातावेळी त्या व्यक्तीला दुखापत किंवा जीव जातो . रस्ते वाहतूक मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी वाहनांच्या सुरक्षेसाठी जो प्रस्ताव तयार केला होता त्यामध्ये कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग देण्याचा प्रस्ताव होता . मात्र , नंतर हा प्रस्ताव बदलण्यात आला किंवा ती ओळच काढून टाकली गेली . धक्कदायक म्हणजे स्पीड अलर्ट सिस्टिम , रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाईंडरसारखे कमी किंमतीचे फिचर्स आता येणाऱ्या कारमध्ये अनिवार्य करण्यात आले आहेत . मात्र , पुढील सीटवरील प्रवाशाला एअरबॅग सक्तीची करण्यात आलेली नाही . 29 ऑगस्ट 2017 मध्ये या सुधारणा विधेयकाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले होते . यामध्ये 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या कारमध्ये अतिरिक्त सुरक्षा फिचर्स देणे गरजेचे करण्यात आले आहे. नव्या लाँच झालेल्या कारमधील तीन कार अशा आहेत ज्यांच्यामध्ये एकच एअरबॅग आहे . मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की , लकरच एआयएस कोडमध्ये सुधारणा करण्यात येईल , यामध्ये नव्या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग देणे बंधनकारक करण्यात येणार आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments