top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

सुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार


नवी दिल्ली : (वृत्तसंस्था)गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते.संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतभरातून 44 जणांची निवड करण्यात आली आहे.केवळ मराठीतच नव्हे तर अनेक भाषांमधून ज्यांचा आवाज जगभरात पोहोचलाय त्या सुरेश वाडकरांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी अकादमी पुरस्कार देण्यात येणार आहे.ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अखेरचे पर्व, अनाहत, या साठेचं करायचं काय? अशा अनेक नाटकांचे लेखन त्यांनी केलं आहे. केवळ नाट्यलेखनच नाही तर नाट्यशास्त्रविषयक अनेक पुस्तकांचं लेखन राजीव नाईक यांनी केलं आहे.

75 views0 comments

Comments


bottom of page