top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

सीबीएसई ' मध्ये ३५७ पदांसाठी भरती ; अर्ज करण्यासाठी १६ डिसेंबरची मुदत


(वृतसंस्था) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा अंतर्गत ( सीबीएसई ) ३५७ शिक्षकेतर पदांसाठी भरती केली जाणार आहे . त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून , १६ डिसेंबर ही अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत सीबीएसईने भरती प्रक्रियेसंदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे . भरती प्रक्रियेत उमेदवारांना आधी लेखी परीक्षा आणि त्यानंतर आहे . मुलाखतीला सामोरे जावे लागेल . परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटासाठीचा कटऑफ ५० टक्के असून , इतर मागासवर्गीय संवर्गासाठी कटऑफ ४५ टक्के आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती संवर्गासाठी कटऑफ ४० असल्याचे नमूद करण्यात आले आहे . पदनिहाय माहिती . . . भरती प्रक्रिया राबवल्या जाणाऱ्या ३५७ पदांमध्येसहायक सचिव ( १४ ) , सहायक सचिव माहिती तंत्रज्ञान ( ७ ) , विश्लेषक ( १४ ) , कनिष्ठ हिंदी अनुवादक ( ८ ) , वरिष्ठ सहायक ( ६० ) , लघुलेखक ( २५ ) , लेखा अधिकारी ( ६ ) , कनिष्ठ सहायक ( २०४ ) , कनिष्ठ लेखा अधिकारी ( १९ ) पदांचा समावेश आहे . http : / / cbse . nic . in / newsite / index . htmlया संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे .

32 views0 comments

Comments


bottom of page