(वृत्तसंस्था) राज्यात वाघ वाढले आणि संरक्षित क्षेत्राबाहेर ते पोहोचले , पण या बाहेरील वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न अजूनही कायमच आहे . त्यातही वाघाच्या जीवावर बेतणारी संकटस्थिती उद्भवलीच तर ती हाताळणारी परिपूर्ण यंत्रणा वनखात्याकडे उपलब्धच नाही . भ्रदावती तालुक्यातील सिरना नदीतील दगडाच्या कपारीत अडक लेल्या वाघाच्या मृत्यूने ही हतबलता आणखी ठळकपणे समोर आली आहे . विशेष म्हणजे , मानव - वन्यजीव संघर्षात वन्यजीवप्रेमींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परिसरातील नागरिकांनी वाघाच्या मृत्यूसाठीवनखात्यालादोषी ठरवले आहे . चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र परिसरात आजमितीस तीन ते चार वाघांचा वावर आहे . केंद्राची पाईपलाईन पकडून तिकडच्या बाजूने आवंडा प्रवेशद्वाराकडून गेल्यास भ्रदावती लागून आहे.त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाघ इकडून तिकडे जात असतात . काही दिवसांपूर्वी आष्टी येथे मृत्यू झालेला वाघही औष्णिक विद्युत केंद्र परिसरातीलच होता , स्पष्ट झाले होते . परिसरात अनेकदा नागरिकांना विशेषतः वेकोलि कर्मचाऱ्यांना नेहमीच रस्त्यावर वाघाचे दर्शन होते . एका ठिकाणी तीन - तीन वाघ लोकांना दिसले आहेत . गुरुवारी मृत झालेला वाघ गेल्या दोन महिन्यापासून वेकोलि परिसरात फिरत होता . चार दिवसांपूर्वी नाल्यावर तो नागरिकांना दिसला होता . मात्र , त्याबाबत सांगूनही विभागाने काहीच कृती केली नाही , असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे . नदीत दगडांच्या कपारीत अडकलेल्या वाघाला वाचवता येऊ शकले असते , असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे . मात्र , त्यावेळी विभागाने अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असणाऱ्या खात्यातील कर्मचारी , पशुवैद्यकांचा सल्ला मानण्याऐवजी स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर अधिक विश्वास दाखवला . त्यानुसारच बचावकार्याची सुरुवात झाली त्यामुळे सकाळी सुरू झालेले बचावकार्य सायंकाळी अंधार पडल्यानंतरही पूर्ण झाले नाही परिणामी , सकाळपर्यंत वाघ तग धरू शकला नाही . काही महिन्यांपूर्वी हळदा येथे अशाच गलथान व्यवस्थापनामुळे बिबट्याला प्राण गमवावे लागले होते . या प्रकरणात वेकोलिने वनखात्याला संपूर्ण सहकार्य केले अशावेळी स्वयंसेवकांच्या निर्देशावर चालण्याऐवजी अनुभवी कर्मचारी आणि पशुवैद्यकांची मदत घेतली असती तर कदाचित वाघाला वाचवता आले असते , अशाच प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.
प्रयत्न करूनही वाघालावाचवता आले नाही , पण स्थानिक वन अधिकायांवर आम्हाला पूर्ण भरवसाआहे . इतरलोक काय म्हणतात . यापेक्षा त्यावेळी त्यांना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला . शेवटी प्रयत्नांचा भाग आहे . साधने पद्धती यात कुठेकमी पडतो हेपाहावेलागेल . राहिला प्रश्न स्वयंसेवीच्या मदतीचा तर अधिकारी कर्मचारी कितीही प्रशिक्षित असले तरीही स्वयंसेवीची मदतही घ्यावीच लागते . नितीन काकोडकर,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
コメント