मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन... असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज हे खरं करून दाखवलं. आज सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्याच्या विधानसभेत २८८ जागा असून फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. राज्याच्या निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीआधी भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. परंतु, हा दावा भाजपने फेटाळून लावल्याने शिवसेना-भाजप यांच्यातील युती संपुष्टात आली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असताना आज सकाळी भाजपने राजकीय सर्जिकल स्ट्राइक लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज राजभवनात राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांना किती आमदारांचा पाठींबा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडे १०५ आमदार आहेत. तसेच भाजपला अपक्ष आमदारांचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. अपक्ष आमदारांपैकी किती अपक्ष आमदार भाजपकडे जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच अजित पवार हे राष्ट्रवादीतील किती आमदारांना सोबत घेऊन येतात यावर बरेच काही अवलंबून आहे. आज दुपारी शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडणार असून त्यानंतर राज्याच्या राजकारणातील चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentários