(शिरपूर प्रतिनिधी: श्री मयुर वैद्य)
दि. १३ मे २०२३ शनीवारी शिरपूर येथे कोर्टेवा अग्री सायन्स पायोनियर P3302 विजयउत्सव शेतकरी मेळावा शकुंतला व शंकर नाना मंगल कार्यालय येथे आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमात पायोनियर कंपनीचे प्रमुख सीड्स मार्गदर्शक तसेच झोनल बिजनेस मेनेजर श्री. किशोर पांढरे व संतोष पठाते यांनी परिसरातील शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात शिरपूर येथील श्री कृषी विकास चे संचालक श्री राजूभाऊ भंडारी , निलेश ट्रेडर्स चे संचालक निलेश अग्रवाल , भारतीय किसान संघाचे शिरपूर शहर अध्यक्ष श्री. मयुर वैद्य (IBN Tv NEWS - reporter), श्री गणेश एजन्सी आकलकुवा दिलीप चौधरी ,विजय बीज चे संचालक सुभाषचंद जैन व पंच कृषीतील सर्व रिटेलर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयउत्सव मेळावा कार्यक्रम अंतर्गत परीसरातील शेतकऱ्यांना पायोनियर कंपनीच्या P३३०२ व P३५२४(नवीन) या वाणा पासुन होणाऱ्या अधिक उत्पन्ना बद्दल योग्य ती माहिती देण्यात आली..
पायोनियर P३३०२ व P३५२४ या वाणा मध्ये इतर वाणा पेक्षा जास्त उत्पन्न देण्याची क्षमता अधिक असल्याची माहिती सिड्स मार्गदर्शक प्रतिनिधी श्री. किशोर पांढरे , संतोष पठाते यांच्या कडून देण्यात आली आहे..
पायोनियर या मका वाणाच्या कणसात अधिक दाण्यांची सरासरी व अधिक उत्पन्न देण्याची क्षमता असते त्यामुळे शेतकर्यांना अधिक उत्पन्न कशा प्रकारे काढता येईल तसेच त्याचा फायदा कसा होऊ शकतो या बद्दल देखील माहिती देण्यात आली इतर वाणाच्या तुलनेत पायोनियर P३३०२ व P३५२४ या वाणा पासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न होते.
या कार्यक्रमात मका पिकाचे अधिक उत्पन्न काढणार्या शेतकऱ्यांचा सहकुटुंब सत्कार देखील करण्यात आला व हजारोच्या संख्येने तालुक्यांतील शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच शेतकर्यांनी पायोनियर कंपनी च्या P३३०२ व P3524 या वाणा पासून झालेल्या समाधान कारक उत्पन्ना बद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कलाकार खान्देश रत्न शाम राजपूत (हास्य जत्रा) व योगेश शिरसाठ ( चला हवा येऊ द्या ) यांनी शेतकरी बांधवाचे मनोरजन करून शेतकरी बांधवाना पायोनियर कंपनीच्या मका बियाणे लावून अधिक उत्पन्न घेणे विषयी संदेश दिला.
या विजय उत्सव सोहळ्यात शेतकरी बांधवाना लकी ड्रॉ देखील काढण्यात आले व सर्व उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सर्व नियोजन पायोनिर कंपनीचे सिड्स मार्गदर्शक प्रतिनिधी विशाल गर्जे ,सागर पाटील,गणेश वाकोडे,महेश भट्ट ,संतोष शिंगणे,प्रतिभा बच्चाव, गौरव पाटील,बाळासाहेब शिंदे, भूषण कापुरे,तुषार भदाणे,दिनेश देसले,चेतन पवार तसेच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
Comments