(शिरपूर प्रतिनिधी : मयूर वैद्य)
शिरपूर महसूल प्रशासनाकडून तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुख म्हणून तहसीलदार शिरपूर यांनी तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून प्रशासनाकडून नागरिकांसाठी खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे 41 पैकी 4 गेट पुर्ण व 32 गेट 1.50 मीटर उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 179895 cusecs इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत 200000 ते 250000 cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे.
हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याने तापी नदीपात्रातील विसर्गातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून कळविणेत आले आहे.
तरी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तहसिल कार्यालय, शिरपूर तर्फे नदीकाठच्या सर्व नागरीकांना आवाहन व सतर्क करण्यात येते की, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालनकरावे व खबरदारी घ्यावी.
१) सखल भागात राहणा-या नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
२) नाले, ओढे, नदी काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे.
३) पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये.
४) पुर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.
५) जुनाट / मोडकळीस आलेल्या धोकेदायक इमारतीमध्ये आश्रय घेवू नये... ६) पुरग्रस्त भागातून वाहने चालवू नये..
७) जमिनी खालून जाणाऱ्या विद्युत तारांपासून सावध राहावे.
८) पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्न पदार्थ खावू नयेत.
९) नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.
१०) पिण्याचे पाणी उकळून प्यावे व जेवणाआधी हात स्वच्छ धुवून घ्यावे.
११) अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगर पायाशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
१२) घाट, डोंगर रस्ते, अरुद रस्ते, दरी खोरे येथून प्रवास करणे टाळावे.
१३) धरण, नदी क्षेत्रामध्ये, धबधबे, डोंगर माथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धोकेदायक ठिकाणी चढू अथवा उतरू नये.
आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षास संपर्क करावा असे आव्हन तहसीदार, शिरपुर यानी केले आहे
Comments