(शिरपुर प्रतीनीधी : श्री मयूर वैद्य)
शिरपूर तालुक्यातील खर्दे बु।। येथील आर. सी. पटेल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजकपूर मराठे, खर्दे गावाच्या सरपंच सविता बेन पटेल, उपसरपंच नितीन गुजर, माजी सरपंच रविंद्र भाई गुजर, माजी सरपंच भरत भाई गुजर, काशिनाथ भाई पटेल, उंटावद व साकवद येथील सरपंच व उपसरपंच, माजी पंचायत समिती सदस्य मनोज भिल, केंद्र प्रमुख अनिल बाविस्कर,आर.सी.पटेल प्राथमिक शाळेतील विविध शाखेचे मुख्याध्यापक बी.आर.महाजन,गणेश साळुंखे, ईश्वर पाटील, रवींद्र खोंडे, गोपाल पाटील, महेंद्र परदेशी, प्रदीप गहिवरे, रेखा सूर्यवंशी, विद्यलयाचे प्राचार्य पी. आर.साळुंखे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे आश्रयदाते स्व.रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी व स्व.हेमंतबेन पटेल उर्फ मम्मीजी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आधारित वेगवेगळे नृत्य सादर करण्यात आली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्तांनी केलेला त्याग त्यांच्या जीवनपट व तसेच विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती दर्शन घडले यात काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायनातून देशभक्तांना अभिवादन केले यात देश रंगीला रंगीला, ढोलतारो ढोल बाजे, गरबा राजस्थानी भांगडा,बेटी बचाव बेटी पढाव या थीम वर आधारित नृत्य, कृष्ण भक्ती पर गीत सादर करण्यात आली उपस्थित प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली एकूण 23 समूह नृत्य व गीत गायन ,नाटिका अशा विविध प्रकारात प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए जे पाटील व श्रीमती आर आर राजपूत यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ ,अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, पी बी धायबर, डी एम पवार, बडगुजर,अटकळे,सीमा जाधव, मनीषा पाटील, छाया पाटील, सुनंदा निकम, लालसिंग राजपूत, अनिल माळी आदींनी प्रयत्न केले.
Comments