(शिरपूर प्रतिनिधी श्री मयूर वैद्य)
ग्राहक पंचायतीतर्फे शिंदखेडा येथील बसस्थानकासमोर ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होतील.
ग्राहक पंचायतीच्या शिंदखेडा येथील शाखेचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात पंचायतीचे विभागीय अध्यक्ष डॉ अजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपूर्ण झाली. यावेळी पंचायतीचे सहसचिव श्रीकांत पाठक उपस्थित होते. यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व नानासाहेब स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. पंचायतीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित, शिरपूर तालुका संघटक राकेश मोरे , साखरी तालुका संघटक विलास देसले , दोंडाईच्या शहराध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉक्टर श्रीराम महाजन यांनी अहवाल सादर केले. पंचायतीच्या शिंदखेडा तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेले रवींद्र ठाकुर व प्रसिद्धी प्रमुख प्रा. भैय्या मागले यांचा एडवोकेट वसंतराव भामरे व विजया वाघ यांच्या हस्ते सत्कार झाला. ग्राहक मार्गदर्शन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने जितेन्द्र मेख यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिरपूर चे सदस्य श्री मयुर वैद्य, श्री राहुल स्वर्ग, श्री विपुल कुलकर्णी, श्री विकास आहिरे, श्री संदीप मगन शिरसाठ, श्री विजय जयंतीलाल पटेल , ऋषिकेश योगेश जोशी व कायदे तज्ञ म्हणून एडवोकेट सुहास वैद्य यांच्या सत्कार व अभिनंदन करण्यात आले. डॉ अजय सोनवणे यांनी जिल्हा अभ्यास वर्ग घेणे, ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, सामाजिक चातुर्मास संदर्भग्रंथ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देणे, शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, ग्राहक संरक्षण कायदे आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
Comments