top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रम


पुणे , ता . ५ : नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुणे वन विभागाच्या ( वन्यजीव ) संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहानिमित्त रविवारी ( ता . ६ ) आणि सोमवारी ता . ७ ) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . मयूरेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे रविवारी सकाळी सात वाजता क्षेत्रभेटीचे आयोजन केले आहे एस . एम . जोशी सभागृहाच्या नवीन कॉन्फरन्स हॉलमध्ये दहा वाजता वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या युवकांशी साधण्यात येणार आहे . त्यानंतर कीटकांच्या जीवनावर आधारित चर्चासत्र कल्याण वर्मा यांच्या ' बिग कॅट्स ' माहितीपटाचे सादरीकरण , ' मेस्मरायजिंग वर्ल्ड ऑफ अँफिबीयन्स अँड रेप्टाइल्स या विषयावरील परिसंवाद आणि वन्यजीव चित्रपटकार विजय बेदी यांच्या ' द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स ' या माहितीपटांचे सादरीकरण होईल . या वेळी राज्य वनविभागाचे ( वन्यजीव , पश्चिम ) अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत वनभवन येथे सोमवारी दुपारी चार वाजता रीटा बॅनर्जी यांच्या ' वाइल्ड मीट ट्रेल ' या वन्यजीव माहितीपटाचे सादरीकरण होईल . सप्ताहाच्या समारोपाचा कार्यक्रम जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक ( प्रादेशिक ) विवेक खांडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे .

3 views0 comments

Comments


bottom of page