मुंबई:- दीपावलीत खास लक्ष्मीपूजनासाठी स्टेट बँकेत वीस रुपयांच्या नव्या नोटा ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या नोटा नाशिकरोड नोट प्रेसमध्ये छापण्यात आल्या आहेत. स्टेट बँकेच्या नाशिकरोड येथील दुर्गा उद्यानासमोरील शाखेत ग्राहक, खातेदारांना जुन्याच्या बदल्यात नवीन नोटा उपलब्ध केल्या जातात. रिझर्व्ह बँकेकडून स्टेट बँकेच्या या शाखेला गेल्या वर्षापर्यंत या नोटा पाठविल्या जात होत्या. तथापि, यंदापासून स्टेट बँकेच्या देवळाली कॅम्प शाखेत रिझर्व्ह बँकेतर्फे त्या उपलब्ध केल्या जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना सांगण्यात आले. त्यामुळे नाशिकरोडच्या ग्राहकांची निराशा होत आहे. त्यांना नवीन नोटांसाठी देवळाली कॅम्पला जावे लागत आहे. जेलरोडच्या काही हौशी ग्राहकांनी ओझरच्या स्टेट बँक शाखेतून वीसच्या नवीन नोटांचे बंडल मिळवले आहे. यावर्षी दिवाळीत स्टेट बँकेच्या नाशिकरोड शाखेत नवीन नोटा उलब्ध करण्याची मागणी समाजसेवक तुळशीदास इंगळे यांनी केली आहे. इंगळे हे दरवर्षी नवीन नोटा हौसेने गोळा करून लक्ष्मीपूजनाला त्यांची पूजा करतात. नाशिकरोड प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या चलनी नोटांची छपाई होते. छापल्यानंतर त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्या जातात. तेथून त्या स्टेट बँके मार्फत देशभरात वितरीत होतात.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments