top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

वास्तव- कोणी शैक्षणिक साहित्य देता का, साहित्यsss?


श्रीकांत भामरे :- वास्तव- कोणी शैक्षणिक साहित्य देता का, साहित्यsss? गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या तुफानाला कोणी शैक्षणिक साहित्य पुरवता का...? 'नटसम्राट'मधील नटासारखी परिस्थिती वसुंधरा फाउंडेशनची झाली आहे आणि पुढाकार घेऊन सम्राटाला सुध्दा लाजवेल असे महान कार्य करत आहे. ही संस्था समाजातील वंचित व गरीब परिवारातील विद्यार्थ्यांसाठी दारोदारी भटकत लोकांशी संपर्क साधून "कोणी शैक्षणिक साहित्य देता का"? या उपक्रमातून हाक देत आहेत, मात्र त्यांच्या हाकेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने कुठे तरी दानपर्वाचं योगदान कमी होत आहे. या उपक्रमात साथ हवीय ती आपल्यासारख्या 'महान दानशूर' व्यक्तींची. तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्राचे रूप बदलू लागले आहे. हल्लीचे नवे शिक्षण हे पाटी-पेन्सिलने चालत नाही. तर त्यात टॅब,अँबकस, डिजिटल शैक्षणिक साहित्याने जागा घेतली आहे. परंतु, काही ठिकाणी मुलांच्या नशिबी साधे वही-पेनही गरीब पालक पुरवू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. शिक्षणाची आवड असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना अनेकवेळा शैक्षणिक साहित्य नसल्याने शाळा सोडावी लागते. शैक्षणिक साहित्य नसल्यामुळे अशी परिस्तिथी कोणावर येऊ नये म्हणून चाळीसगावातील 'वंसुंधरा' या संस्थेने गरजू विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोचवण्याची चळवळ अनेक वर्षांपासून सुरू केली आहे. या उपक्रमामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी 'दानशूर' व्यक्तीनी नवीन वह्या, पुस्तके, दप्तर, वॉटर बॅग, कंपास, ड्रेस, बूट, स्टेशनरी, शालेय साहित्य दान करू शकतात. संस्थेच्या सदस्यांकडे या वस्तू जमा केल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना या वस्तूचे वाटप केले जाणार आहे. समाज म्हटला तर तुमच्या आमच्या सारखे माणसे यात आली. या युगात रोजच्या रोज परिस्थितीशी झुंझावे लागत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे म्हणजे यशाचा मार्ग सापडेल,अशा अनेक परिस्थितीतून माणूस बाहेर पडू शकतो ते केवळ शिक्षणामुळेच. शिक्षण आणि परिस्थिती एका सुई धाग्यात गुंफलेले असतात. काहीजण परिस्थिती नाही म्हणून शिकू शकत नाहीत आणि शिक्षण नाही म्हणून त्यांची परिस्थिती सुधारत नाही. आपण ज्या शिक्षणामुळे आज समाजात पद, प्रतिष्ठा मिळवली आहे. अगदी त्याच पद्धतीने शैक्षणिक साहित्य न मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा आपण मदत करून आपल्या सारखीच प्रतिष्ठा मिळवून द्यावी हेच प्रामाणिक धोरण संस्थेचे आहे. म्हणून नटसम्राटमधील डायलॉग आठवतो.... गरीब विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या तुफानाला कुणी शैक्षणिक साहित्य देता का? हे ज्ञानाच तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून शिक्षणाच्या जंगलाजंगलात हिंडतय. जिथून कुणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी एक जागा धुंडतय. कुणी शैक्षणिक साहित्य देता का शैक्षणिक साहित्य ?"

5 views0 comments

Comments


bottom of page