पुणे:- विश्व हिंदू परिषदेच्या विशेष संपर्क विभागाचे सचिव प्रा.व्यंकटेश आबदेव यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.आबदेव हे मूळचे मुरुड जंजिरा येथील आहे.सध्या पुणे कात्रज येथे मुलाकडे त्यांचे सध्या वास्तव्य होते.१० दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अस्थिर झाल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.सोमवारी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. प्रा. आबदेव हे विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ काम करत होते.त्यामुळे ते कायम दिल्लीत असायचे.मागच्या दोन वर्षांपूर्वी त्यांना राजस्थान मध्ये अर्धांगवायूचा झटका आला होता.त्यानंतर भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये त्यांचे उपचार सुरू होते.त्यांच्यामागे पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे. .
Comments