पुणे :-(वृत्तसंस्था) : " राजकीय आखाड्यात पूर्वी पवार शक्तिशाली पहिलवान होते . मीही त्यांच्या तालमीत तयार झालो . पण , आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि मी , असे तीनच पैलवान आहेत . विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू , " असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला . पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते . खासदार गिरीश बापट , रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी उपस्थित होते . आठवले म्हणाले , “ काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतून निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने नेते स्वतःहून भाजप शिवसेनेत येत आहेत . शरद पवार यांचे वय झाले असले , तरी ते एकटेच किल्ला लढवत आहेत . मला त्यांचे कौतुक वाटते . पण , त्यांना २०१४ पेक्षाही कमी जागा मिळणार आहेत . या उलट महायुतीचे २३० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील . विरोधकांनी ईव्हीएमला दोष देऊ नयेत . माणसांच्या मनाची मशिन आमच्याशी जोडल्याने महायुती जिंकत आहे . मशिनमध्ये दोष असेल , तर सुप्रिया सुळे , अमोल कोल्हे हे कसे जिंकले ? अशी टीका आठवले यांनी केली .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments