पुणे (वृत्तसंस्था) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर गप्पा मारणाऱ्या दोघांनी आपल्याला उद्देशून बोलल्याचे कारण करून सायकलस्वाराने त्यांच्याबरोबर भांडण केले . त्यानंतर सायकलस्वाराने त्यांच्यासह चौघांवर चाकूने वार केले . याप्रकरणी शाहरुख शेख ( वय २३ , रा . दापोडी ) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला . पोलिस उपनिरीक्षक आर . व्ही . माळेगावे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्याच्या सहकारी तरुणीसोबत विद्यापीठाच्या मैदानामध्ये गप्पा मारत होते . त्या वेळी तेथून जाणाऱ्या सायकलस्वाराचा ते आपल्याला काहीतरी उद्देशून बोलले , असा गैरसमज झाला . त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले . दरम्यान , फिर्यादीने त्याचा भाऊ अजहर शेख व त्याचा मित्र चेतन येडल्लू यास बोलावून घेतले . ते आल्यानंतर चौघेजण सायकलस्वारासमवेत भांडू लागले . त्या वेळी सायकलस्वाराने त्यांना मारहाण करून त्याच्याकडील चाकूने त्यांच्यावर वार केले . यात तिघे जण किरकोळ जखमी झाले असून येडल्लू हा गंभीर जखमी झाला आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments