top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

लोणावळा आणि पुणे परिसरात चोऱ्या करणारी टोळी गजाआड, पाच गुन्हे उघड

लोणावळा शहर पोलिसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून चोरीच्या मुद्देमालासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.






वृत्तसंस्था

लोणावळा: लोणावळा शहर पोलिसांनी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून चोरीच्या मुद्देमालासह सात जणांना ताब्यात घेतले आहे. नांगरगाव, भांगरवाडी आणि रेल्वे परिसरात चार गुन्हे घडले होते. तर, एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.चिंतन लक्ष्मण पाठारे (वय १९, रा. ओळकाईवाडी लोणावळा), शेखर मारुती मंजुळे (वय १९, रा. केवरे कुसगाववाडी ता. मावळ), आकाश भरत ओहाळ (वय २४, रा. केवरेगाव ता. मावळ), सबरोज अहमद निहाज अहमद मुजावर (वय २४, रा. डोंगरगाव ता. मावळ), रफिक शमशेर पठाण (वय २४, रा. देवणी जि. लातूर, सध्या राहणार लोणावळा), रविशंकर रामदास गौतम (वय २०, रा. कानपूर सध्या रा. वलवण पुलाजवळ लोणावळा), निखिल महेंद्र निकाळजे (वय २६ रा. नांगरगाव लोणावळा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ५२ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी वापरलेली एकूण तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी ही माहिती दिली. लोणावळा शहरात मागील काही दिवसांमध्ये जबरी चोरी आणि चोरीच्या घटना वाढल्या होत्या. मागील आठवड्यात नांगरगाव भागात चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. याचा तपास करत असताना लोणावळा शहर पोलीस पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे गुन्हे उघडकीस आले असल्याचे कार्तिक यांनी सांगितले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार, पोलीस उप निरीक्षक लतिफ मुजावर, सहाय्यक फौजदार सुनील वाणी, पोलीस हवालदार मयूर आबनावे, पोलीस नाईक फरांदे, पोलीस हवालदार राजेंद्र मदने, मनोज मोरे, स्वप्नील पाटील, रमेश उगले, विरसेन गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

3 views0 comments

Komentáře


bottom of page