दिल्ली :देशाच्या संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा 'प्रेसिडेंट कलर' देऊन सन्मान करण्यात आला . संरक्षण दलांचे सुप्रिम कमांडर तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान नाशिकमध्ये प्रदान केला. नाशिक-पुणे रोडवरील कॅटच्या प्रांगणात होणारी लष्करी परेड हे विशेष आकर्षण ठरली. हिमालयातील सियाचिन हिमशिखरे, कच्छमधील रण आणि ईशान्येतील पर्वतीय प्रदेश अशा सर्वच भौगोलिक आणि आव्हानात्मक क्षेत्रात देशाच्या संरक्षणाचे कामकाज चोखपणे बजावणाऱ्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा प्रेसिडेंट कलरने सन्मान केला. कम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग अर्थात कॅटमध्ये होणाऱ्या शानदार समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. १९८४ मध्ये हिमालयातील सियाचीन या हिमशिखरांवर आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने पहिल्यांदा चिताह हेलिकॉप्टर नेले होते. विविध प्रकारच्या भौगोलिक आणि प्रतिकूल परिस्थितीत आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने अतूलनीय असे कार्य केले आहे. त्याचा गौरव म्हणूनच संरक्षण क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या प्रेसिडेंट कलरने सन्मान झाला. कॅटमध्ये होणाऱ्या या शानदार समारंभावेळी आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल कन्वल कुमार यांची उपस्थिती आहे. तर, कॅटचे कमांडंट ब्रिगेडिअर सरबजीतसिंग बावाभल्ला यांनी परेडचे नेतृत्व केले. या सन्मानामुळे प्रेसिडेंट कलर प्राप्त झालेल्या अत्यंत मोजक्या संस्थांमध्ये आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा समावेश होणार आहे. म्हणून कॅटमध्ये सोहळा आर्मी एव्हिएशन कॉर्प्सची मुख्य ताकद ही कॅट आहे. कारण, याठिकाणी आर्मीच्या पायलटसला हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे याठिकाणाहूनच खऱ्या अर्थाने कॉर्प्सच्या कार्याला पंख लाभत आहेत. चिताह, चेतक यासह विविध प्रकारच्या हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण याठिकाणी दिले जात असून, त्यासाठीचे सिम्युलेटरही येथे साकारण्यात आले आहे. प्रशिक्षण काळात एकही अपघात होऊ नये याची पूर्णत: काळजी घेतली जा
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments