top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

लाच घेतांना तलाठी जाळ्यात


नांदगाव:- पंधराशे रूपयांची लाच घेतांना तलाठी राजकुमार उत्तमराव देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले . नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या देशमुख याने शेतीच्या ड उताऱ्यात फेरफार करण्याच्या बदल्यात पंधराशे रुपयांची लाच फिर्यादी कडे मागितली होती . त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती . ठरल्याप्रमाणे नांदगाव शहरातील रेल्वे फाटकाजवळ लाचेचे पंधराशे रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटिल , पोलिस हवालदार सुभाष हांडगे , पोलिस नाईक राजेंद्र गीते यांच्या पथकाने देशमुखला ताब्यात घेतले . त्याच्याकडून पंधराशे रुपये हस्तगत करण्यात आले . याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचला .जाळ्यात आलेल्या तलाठींचे नोकरीचे अवघी चार वर्षे शिल्लक आहेत . दुसऱ्यांदा त्यांना लाच प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे . लाचलुचपतच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

27 views0 comments

Comments


bottom of page