३ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड आकारणी
वृत्तसंस्था:- मुंबई दि.०५- लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ४ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९३ हजार ७३१ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४६६ व्यक्तींना अटक करण्यात आली.या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
सर्वाधिक व सर्वात कमी गुन्हे
या काळात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुणे शहर-१५ हजार ८६, मुंबई -१० हजार ५५४,अहमदनगर-९ हजार ४६, पिंपरी-चिंचवड-७ हजार ५१९, आणि पुणे ग्रामीण-५ हजार ६९३ अशी आहे. तर सर्वात कमी वर्धा- १५७,नंदुरबार-११०, गडचिरोली-९०, रत्नागिरी-७५, आणि अकोला-७२ अशी गुन्ह्यांची नोंद आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८४ हजार ०२२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२७० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५२ हजार ५५५ वाहने जप्त करण्यात आली .
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८१ घटनांची नोंद झाली असून यात ६६१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले.सध्या ४० पोलीस अधिकारी व ३७८ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.
Comments