(वृतसंस्था) मुख्यमंत्री आमचाच होणार असा निर्धार केलेल्या शिवसेनेनं आता कोणत्याही तडजोडीला सामोर जाण्याची तयार असल्याचा इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून तसे संकेत दिले आहे. “रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…,”असं ट्विट करून राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे सुतोवाच दिले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवस लोटले आहेत. बहुमत मिळालेल्या भाजपा-शिवसेना यांची महायुती मुख्यमंत्रीपदारून दुभंगल्यानं भाजपानं सरकार स्थापन करण्यास नकार दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचं सांगितलं.त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं. दोन्ही काँग्रेससोबत तडजोडी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुढाकार घेतला असून, आज दिवसभरात वेगवान घटना घडणार असल्याचे संकेत राऊत यांनी सकाळीच ट्विट करून दिले आहेत. संजय राऊत यांनी वन्स अपॉन टाईम इन मुंबई या हिंदी सिनेमातील एक संवाद ट्विट केला आहे. “रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…,” असं म्हणत राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी कोणत्याही तडजोडीसाठी तयार असल्याचा इरादा बोलून दाखवला आहे. आज दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडं नाही. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेची मदार असणार आहे. दुसरीकडं शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. तर राष्ट्रवादीही शिवसेनेस पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं दिसून येत आहे. मात्र, पाठिंबा हवा असल्यास शिवसेनेला ‘एनडीए’तून बाहेर पडावं लागेल अशी अट राष्ट्रवादीनं घातली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments