top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांचा मतमोजणीवर आक्षेप


चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील मतमोजणी कक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांनी गोंधळ घातला . मतमोजणी प्रक्रियेबाबत त्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला . चाळीसगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या विरूद्ध भाजपचे मंगेश चव्हाण यांची लढत होती . सुरवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये देशमुख यांची आघाडी होती . तिसऱ्या फेरीनंतर मंगेश चव्हाण यांनी आघाडी मोडीत काढत पुढे कायम ठेवली . आतापर्यंत झालेल्या 16 व्या फेरीअखेर भाजपचे मंगेश चव्हाण यांना 61 हजार 306 मत मिळाली तर राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांना 57 हजार 11 मत मिळाली आहे . चव्हाण यांनी आघाडी कायम राखली असून , मतमोजणी सुरू असताना राष्ट्रवादीचे देशमुख व त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी कक्षात जावून मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत गोंधळ घातला . यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले . दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढत मतमोजणी सुरू केली आहे .

445 views0 comments

Comments


bottom of page