मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले नेते पक्षात परतण्यास इच्छुक असून अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने तयारीला लागा , असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी पक्षाच्या पराभूत उमेदवारांना केले . पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता फेटाळून लावत विधान परिषदेवर संधी मिळेल अशा भ्रमात राहू नका , असा सल्लाही पवार यांनी या नेत्यांना दिला . विविध आयुधांचा वापर करून विधानसभेत आणि लोकसभेत सरकारलासव्ये की पळो करून सोडणार आहोत , असेही पवार यांनी स्पष्ट केले . जय - पराजय सन्मानजनक असला पाहिजे , असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचा सन्मानजनक विजय झाला असल्याचे पवार यांनी सांगितले . अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत असताना मनात संभ्रमन ठेवता जोमाने काम करावे अशी सूचना पवार यांनी केली .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments