top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

राष्ट्रपतींचा ९ ला नाशकात मुक्काम

Updated: Oct 5, 2019



नाशिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद ९ ऑक्टोबरला नाशिकमध्ये मुक्कामी येणार आहेत . देवळाली कॅम्प कॅट्स व आर्टिलरी स्कूलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना ते १० ऑक्टोबर रोजी हजेरी लावणार आहेत . राष्ट्रपती सपत्नीक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याची शक्यता असून , त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे . राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तयारीचा आढावा घेतला . मध्यवर्ती सभागृहात झालेल्या बैठकीला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील , विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे , पोलिस अधीक्षक आरती सिंह , निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांसह सैन्य दलासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते . राष्ट्रपतींच्या उपस्थितीत नव्याने सज्ज झालेल्या बटालियनला झेंडा प्रदान करण्यात येणार आहे . देवळाली कॅम्प येथे गुरुवारी ( दि . १० ) हा कार्यक्रम होणार असून , ते बुधवारी सायंकाळी नाशिकमध्ये मक्कामी येणार आहेत गोल्फ क्लबलगतच्या सरकारी विश्रामगृहावर राष्ट्रपतींचा मुक्काम असणार आहे . राष्ट्रपतींचा अधिकृत दौरा लवकरच प्राप्त होईल , अशी माहिती प्रशासनाने दिली .

96 views0 comments

Commentaires


bottom of page