रावेर :- येथिल विजया बॅकेच्या शाखेवर सव्वादोन् वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरटयांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरटयांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध केला असता त्यांच्या छातीत बंदूकीच्या दोन गोळया झाडण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर इतर कर्मचर्यानी सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील,पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेत मॅनेजर करण नेगे यांना उचलून रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेतांना वाटेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेनंतर इतर कर्मचर्यानी सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील,पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेत मॅनेजर करण नेगे यांना उचलून रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेतांना वाटेत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनास्थळी निभोरा पो.स्टे. चे सपोनि प्रकाश वानखेडे त्यांच्या सहकाऱ्यासोबत बँकेत दाखल झाले असून पोलीस तपास सुरु आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments