वृत्तसंस्था मुंबई, :फार्मा क्षेत्रात आपण क्रांतीकारक बदल करत आहोत. औषध उत्पादक कंपन्यांच्या सूचनांनुसार रायगड जिल्ह्यात देशातील सर्वात अद्ययावत अशा फार्मा पार्काचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.लॉकडाऊन दरम्यान औषध निर्मिती उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी आज विविध फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत वेबिनारद्वारे संवाद साधला.
श्री. देसाई म्हणाले की, देशात तीन ठिकाणी फार्मा पार्क सुरू करण्याचा केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे. प्रत्येक फार्मा पार्कमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्रात फार्मा पार्क सुरू व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. रायगड जिल्ह्यात हा पार्क सुरू केला जाऊ शकतो. सर्वसुविधांयुक्त असा हा पार्क असेल. याठिकाणी कॉमन फॅसिलिटी सेंटर, कॉमन अफ्यूलंट प्लँट, कॉमन टेस्टिंग सेंटर, कर्मचारी प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा पुरविल्यात जातील, या क्षेत्रातील गुंतवणुकदारांनी पुढे यावे, सूचना कराव्यात त्याचा विचार करण्यात येईल.
या वेबिनारमध्ये सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडचे सतीश वाघ, इंडियन ड्रग मॅन्यूफ्र्चर असोसिएशनचे दारा पटेल, महेश दोषी, योगिन मुजूमदार, दिनेश शहा, किशोर मसूरकर, अजित गुंजीकर आदी उपस्थित होते.
Comments