top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

रामजन्मभूमी निकालामुळे ' सीए ' परीक्षा लांबणीवर


(वृत्तसंस्था) पुणे : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडून ( आयसीएआय ) सनदी लेखापाल ( सीए ) अभ्यासक्रमाच्या विविध विषयांची देशभरातली शनिवारची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली . राम जन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अनेक भागांतील शाळा , महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याने आयसीएआयने हा निर्णय संकेतस्थळावर जाहीर केला . _ _ आयसीएआयकडून सीए फाउंडेशन , पेपर वन , फायनल पेपर फाइव्ह , आयआरएम पेपर वन , आयएनटीटी आणि डीआयएसए ईटी यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या . मात्र , सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यात येणार असल्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून देशभरातील विविध भागांमध्ये शाळा , महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि गैरसोय टाळण्यासाठी आयसीएआयने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले . परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयसीएआयचे कार्यकारी सचिव राकेश सेहगल यांनी संकेतस्थळाद्वारे स्पष्ट केले .

9 views0 comments

Comments


bottom of page