top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात जाण्याचे चिन्ह

मुंबई:- काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे भाजपात काँग्रेसचे किती आमदार जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.तसेच संभाव्य राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात विखेना कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता आहे.मंगळवारी मुंबईत विखे पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. सगळयांना हेच वाटत होते की ह्या बैठकीत विखे पाटील यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त निघेल पण भेटीनंतर महाजन यांनी आजून पक्षप्रवेशची औपचारिकता बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री महाजन यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा देण्यास आलो होतो असे विखे पाटलांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील

4 views0 comments

Comments


bottom of page