भारतीय शेअर बाजारात आज सकाळपासूनच जोरदार मागणी दिसून आली .याला मुख्य कारण म्हणजे काल मोदींनी शपथ ग्रहण केली मोदी पर्व सुरू,कोणाला कोणते मंत्रिपद मिळेल यावर सुद्धा बाजाराने सकारात्मक रूप घेतलेले दिसते. आज बाजारात विदेशी वित्तीय संस्थान कडून खूप मोठ्या प्रमाणात खरेदी बघायला मिळाली त्यामुळेच मुंबई बाजाराचा निर्देशांक ३२९ अंकांनी वधारून ३९८३२ ह्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी सुद्धा ८४ अंकांनी वधारून ११८४६ ह्या पातळीवर स्थिरावला. बाजाराने २३ मे ला निफ्टी ने सर्वच्च स्तर गाठला होता. निफ्टी ने आज सुद्धा सर्वच्च सस्तर गाठला परंतु बंद होतांना ११९४६ वर बंद झाला. ज्या पद्धतीने राजकीय बदल घडत आहेत त्याप्रमाणे बाजार आपली दिश्या मजबूत करतांना दिसत आहे. विदेशी संस्था ज्या पद्धतीने भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे ,त्यावरून हे स्पष्ट होत आहे की बाजार लांब अवधी साठी भारतीय शेअर बाजार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे असे दर्शवते. करण विदेशी वित्तीय संस्था शेअर बाजारात गुंतवणूक करतांना लांब अवधीसाठीच गुंतवणूक करत असतात. आज बाजारात बँकिंग संभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसली. त्याच बरोबर पॉवर, टेलिकॉम,एनेरजि, फायनान्स आणि आई टी क्षेत्रात मागणी दिसली तर ऑटोमोबाईल ,मेटल , रियालिटी व ग्राहक उपयोगी संभागांमध्ये विक्री दिसली.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments