(वृत्तसंस्था) राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याच्या मार्गात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ . मोहन भागवत यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडीत संघ पुन्हा केंद्रस्थानी आला , अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे . संघाकडून नेहमीच राजकारणापासून अलिप्त असल्याचा दावा केला जातो . मात्र भाजपच्या निर्णयप्रक्रियेत संघाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरतेहा आजवरचा इतिहास आहे . निवडणुकीतही भाजपच्या विजयासाठी संघ स्वयंसेवकांची सक्रियता कधीही लपून राहिली नाही मात्र हा सहभाग उघडपणे नसतो संघविचारांची संस्था किंवा संघटनेच्या माध्यमातून मोहीम राबवली जाते . या पार्श्वभूमीवर मंगळवारी देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक डॉ . मोहन भागवत यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण ठरते . या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे . मात्र संघाकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही ; पण यामुळे सत्तास्थापनेच्या घडामोडीत संघ केंद्रस्थानी आल्याचे चित्र निर्माण झाले आहे . या संदर्भात भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांची घेतलेली भेट ही औपचारिक होती . राजकीय भेट असती तर मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे इतरही नेते असते . राम मंदिर - बाबरी मशीद वादावर न्यायालयाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे . या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली असावी त्यासोबत राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असावी मात्र कोणत्याही राजकीय घडामोडींमध्ये संघ कुठेच हस्तक्षेप करीत नाही . त्यामुळे या बैठकीचे गैरअर्थकाढू नये . दरम्यान , देवेंद्र फडणवीस हे संघ स्वयंसेवक असल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे , अशी संघाचीही इच्छा आहे . त्यामुळेच सध्याची राजकीय कोंडी फोडण्यासाठी संघ सक्रिय झाला असण्याची शक्यता आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments