top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

राज्यात १६ दिवसांत ६५ कोटींचे मद्य जप्त



मुंबई , ता . ५ : राज्यातील ओल्या दुष्काळानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे . राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या १६ दिवसांत ६५ कोटी ३६ लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे . विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले . अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत . या पथकांनी अवैध मद्यसाठ्याविरोधात छापासत्र उघडले आहे . दारूबंदी असलेल्या वर्धा , चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे

7 views0 comments

Comments


bottom of page