पुणे (वृत्तसंस्था) : राज्यातील वनांची प्रतवारी दिवसेंदिवस घसरत चालली आहे . सद्यःस्थितीत राज्यात सर्वोत्कृष्ट प्रतवारी असलेले एकही वन शिल्लक नाही . जेथे वनांच्या नावाखाली हरित छत्र दिसते , ते वन नसून एक प्रकारचे हिरवे वाळवंट असल्याचे मत राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) माधवराव गोगटे यांनी व्यक्त केले . वनांच्या शाश्वत विकासासाठी वृक्षारोपणाचे सोहळे करून देखावा निर्माण करण्याऐवजी त्यांचे ' इको - रिस्टोरेशन पर्यावरणीय दृष्ट्या पुनर्स्थापना ) करण्याची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी वेळी व्यक्त वनराई संस्थेच्या वतीने शाश्वत वनीकरण या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन गोगटे यांच्या हस्ते झाले वेळी ते बोलत होते वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया अध्यक्षस्थानी होते . माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख , वनस्पतितज्ज्ञ प्रा . श्री . द . विश्वस्त रोहिदास मोरे , विशेषांकाचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर , सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर आदी उपस्थित होते . " जगातील अन्य देशांमध्ये वृक्षांची घनता भारतापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे . " असे प्रा . महाजन यांनी सांगितले .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentarios