(वृत्तसंस्था)एकीकडे गुणवत्तेच्या चर्चा करताना प्रत्यक्षात राज्यातील शाळांमध्ये नेमके काय चालले आहे , आवश्यक सुविधा किती , याबाबत राज्याचा शिक्षण विभाग मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे . शिक्षण विभाग राज्यातील शाळांची नाममात्र पाहणी करत असल्याचे समोर आले आहे . मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यक्षमता प्रतवारी निश्चित केली आहे . त्यामध्ये एकूण ७० निकष देण्यात आले आहेत . युद्धयस , राष्ट्रीय संपादणूक चाचणी , माध्यान्ह भोजन , शाळासिद्धी , समग्र शिक्षण अभियान याच्या संकेतिक स्थळांवरील माहिती वापरून केंद्राने क्रमवारी जाहीर केली . त्यामध्ये महाराष्ट्रातील माहितीच्या संकलनात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत संकेतिक स्थळांवर माहिती भरण्यात आलेली नाही . काही ठिकाणी माहितीत तफावत आहे . शाळांच्या तपासणीनंतर शेरे पुस्तकांत नोंदी करण्यात आलेल्या नाहीत . मुळात एकूण शाळांच्या तुलनेत भेट देण्यात आलेल्या शाळांची संख्याही कमी . त्रुटी सुधारून पुन्हा एकदा शाळांना भेटी देण्याची सुचना शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे . या वेळी शाळांना भेटी दिल्याचे पुरावेच अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहेत . त्याचप्रमाणे लगेच संकेतिक स्थळावर नोंदीही कराव्या लागणार आहेत .वर्षातून तीन वेळा तपासणी : राज्यातील सर्व शाळांचीवर्षातून तीन वेळातपासणी करण्यात येणार आहे . या शैक्षणिकवर्षतील तपासणीया महिन्यातहोणे अपेक्षित आहे . दुसरीतपासणी डिसेंबर आणि जानेवारीत तर तिसरी तपासणी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होणार आहे . उरलेल्या शैक्षणिक वर्षात शाळा तपासणीपूर्ण करण्यासाठी अवश्यक तेवढीपथकेनेमण्यची सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Kommentarer