(वृत्तसंस्था) देशाला २०२२ पर्यंत कुष्ठरोगापासून मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात असतानाच राज्यातील कुष्ठरुग्ण कमी होण्याऐवजी वाढत आहेत . गेल्या २०१८ - १९ मध्ये राज्यात १५ हजार २९९ कुष्ठरुग्ण होते , तर एप्रिल ते ऑगस्ट २०१९ पर्यंत दहा हजार कुष्ठरुग्ण नव्याने सापडले आहेत . राज्यभरातील ३२ हजार संशयितांची तपासणी अद्याप झालेली नाही . दरवर्षी सुमारे ४० कोटींचा खर्च करूनही कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे . कुष्ठरुग्ण बरे व्हावेत , या उद्देशाने अनेक संशोधने झाली . विविध औषधांचाही शोध लागला . मात्र , देशातील कुष्ठरुग्ण अद्याप कमी झालेले नाहीत .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments