वृत्तसंस्था:- राज्यात करोनाबाधितांची रुग्ण संख्या अद्यापही वाढतच आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यात 472 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन एकूण रुग्ण संख्या 4 हजार 676 वर पोहचली आहे. तर आणखी नऊ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. याबरोबरच आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 232 वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७६ हजारांच्या वर चाचण्या केल्या असल्याचंही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत राज्यात २३२ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला. ही बाब चिंतेची आहे, मात्र हा मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७६ हजारांच्या वर चाचण्या केल्या असल्याचंही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत राज्यात २३२ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला. ही बाब चिंतेची आहे, मात्र हा मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ही सध्या ७ दिवसांनी दुप्पट होते आहे. हे प्रमाण आपल्याला १५ ते २० दिवसांपासून आणायचं आहे. हळूहळू हे प्रमाणही संपवायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. २८ दिवसांनी नव्याने पेशंट न वाढल्यास तो भाग ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येईल. १४ दिवसात नवा रुग्ण न आढळल्यास तो ऑरेंज झोन जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentarios