चाळीसगाव प्रतिनिधी - भाजपाचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांचे शहरातील लक्ष्मी नगर येथे नवीन ॲपरामेंट चे बांधकाम काम सुरू आहे त्याठिकाणी त्यांनी कामगारांसाठी मुतारी उभारली असुन त्या मुतारीसाठी अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, खा संभाजीराजे भोसले,भाजपा नेते गिरीशभाऊ महाजन यांचे प्रतिमा असलेले बॅनर चा वापर अडोसा म्हणून केल्याने त्या बॅनर वर असलेल्या शिवाजी महाराजांची विटंबना झाली आहे त्यामुळे तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्याने भाजपा नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांना भारतीय जनता पार्टीतुन तत्काळ अपात्र करण्यात यावे अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण व भाजपा शहरअध्यक्ष घुष्णेश्वर पाटील यांच्या कडे शिवप्रेमी संघटनानी निवेदनाद्वारे दि ८ रोजी केली आहे महापुरुषांचा अवमान झाल्याने या प्रकरणामुळे महाराष्ट्रात शिवप्रेमी बांधवांमध्ये सतप्त प्रतिक्रिया उमटत आहे भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि त्याच पक्षात भाजपचे नगरसेवक असलेले राजेंद्र चौधरी यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो असलेला बॅनर मुतारीला लावणे म्हणजे समस्त देशवासीयांच्या भावना दुखावणे आहे यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी त्यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदावरून हकालपट्टी करावी यामुळे शिस्तप्रिय असलेल्या भारतीय जनता पार्टी पक्षाची छबी अखंड राहील पक्षावर शिवप्रेमींचा रोष राहणार नाही म्हणून आपण राजेंद्र रामदास चौधरी यांची हकालपट्टी तात्काळ करावी व शिवप्रेमी बांधवांच्या सयामचा बांध तुटल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल याची नोंद घ्यावी निवेदनावार गणेश पवार, खुशाल पाटील, पंकज पाटील ,पप्पु पाटील ,संजय कापसे ,उत्कर्ष देशमुख ,प्रमोद वाघ ,ज्ञानेश्वर कोल्हे, बंडु पगार ,जितेंद्र पाटील ,भास्कर पाटील ,भावेश कोठावदे , अरुण पाटील, राजेंद्र पगार, योगेश खंडेलवाल, सिध्दार्थ राजपुत, सचिन आव्हाड, अजय पाटील,शुभम नागरे ,अनिल सोनार ,अमोल राजपुत, संदिप काळे, भूषण देशमुख , उध्देश शिंदे , ललित महाजन ,आशुतोष पाटील ,कुणाल भोसले ,रोहन वाघ ,अनिल कापसे ,दिनेश साबळे, निलेश राजपूत अमोल राजपूत,कुणाल तांबे, दिनकर कडलग यांच्या सह शिवप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
תגובות