top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

रिक्षाचालकला मंत्री केले ; अजून काय हवे :- बावनकुळे


नागपूर : (वृत्तसंस्था)एका सामान्य ऑटो चालकाला जि . प . सदस्य , आमदार आणि मंत्री बनविले . हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत . शेतमजुरी करणाल्या , किराणा दुकानात काम करणाल्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते , खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे . भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही , अशी भावनिक प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली . कामठी विधानसभा मतदार संघासाठी भाजपने यावेळी आपल्याला संधी नाकारली , याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही . पक्षाने मला याच मतदार संघातून तीनवेळा आमदार केले . दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले . पक्ष श्रेष्ठीने जो निर्णय घेतला तो मान्य आहे . मी विदर्भात पक्षासाठी काम करावे अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे . त्यामुळे नाराज असण्याचे काहीही कारण नाही . काटोल हा माझ्यासाठी पर्याय होता . मात्र मी तिथून लढलो असतो तर तेथील कार्यकर्त्यावर अन्याय झाला असता . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला माझ्या मोठ्या भावासारखे तर नितीन गडकरी वडीलांसारखे आहेत . त्यांच्या नेतृत्वात मला काम करायचे आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून यापुढेही मी काम करीत राहणार आहे . पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल , असेही मत त्यांनी व्यक्त केले .पूर्व विदर्भात विधानसभा निवडणुकीत मला काम करता येईल , त्यामुळे मला पक्षाने उमेदवारी दिली नाही . माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही , त्याला एबी फार्म नसल्यामुळे तो तसाही बाद होणारच होता,असेही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले .

43 views0 comments

Comments


bottom of page