वृत्तसंस्था पुणे : परीक्षा किं वा मूल्यमापन हे शिक्षण प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग आहे. परीक्षा रद्द करणे हे सूज्ञपणाचे लक्षण नाही. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सध्याची वेळ मारून नेणारा असू शके ल. पण त्याचे पुढचे परिणाम गंभीर आहेत. त्यामुळे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यावी, अशी सूचनावजा शिफारस सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाचे माजी कु लगुरू डॉ. अरूण अडसूळ यांनी के ली आहे.करोना विषाणू संसर्गामुळे विद्यापीठांच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीची शिफारस आणि राज्य शासनाने नेमलेल्या समितीची शिफारस विचारात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा, तर तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा टाळेबंदीनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अडसूळ यांनी परीक्षा रद्द न करता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडी पद्धतीने घेण्याची भूमिका मांडली आहे.शिक्षण प्रक्रियेत परीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अध्यापन केलेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास किती आहे हे परीक्षेतून तपासले जात असते. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात येऊ नयेत, तसेच तृतीय वर्षांच्या परीक्षा लेखी पद्धतीने घेऊ नयेत. सर्वाच्याच परीक्षा तोंडी पद्धतीने घ्याव्यात. कारण तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची टाळेबंदीनंतर लेखी परीक्षा घेतल्यास संसर्गाची त्यावेळची स्थिती, विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था, स्वच्छतागृहांपासून सर्व सुविधा उपलब्ध करणे अडचणीचे ठरू शकते. परस्पर अंतर ठेवायचे असल्याने परीक्षेसाठीचे वर्ग वाढवावे लागू शकतात. त्यामुळे खास बाब म्हणून सर्वाच्याच परीक्षा तोंडी घ्याव्यात. कायद्याचेही उल्लंघन होणार नाही. वेळापत्रक तयार करून एकावेळी सहा प्राध्यापकांनी एकत्र येऊन दिवसभरात प्रथम वर्षांच्या वीस किंवा पंचवीस विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यावी. द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची अशाच पद्धतीने परीक्षा घ्यावी. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि तोंडी परीक्षेचे गुण एकत्रित विचारात घेऊन निकाल तयार करावा. आधीच्या वर्षांचे विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांचीही अशाच पद्धतीने परीक्षा घेता येईल. तोंडी परीक्षा मूलभूत संकल्पनांवर आधारित असावी. परीक्षेवेळी सॅनिटायझर, मुखपट्टी, हातमोजे, परस्पर अंतर या सर्व निकषांचे पालन करणे शक्य आहे. तर तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा विषयनिहाय घ्यावी. या सर्व परीक्षांचे सीसीटीव्ही चित्रीकरण केल्यास त्यात पारदर्शकताही राहील. तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा टाळेबंदीनंतर घेतली जाणार असेल, तर प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात काय अडचण हा प्रश्न आहे. टाळेबंदीनंतर नव्या शैक्षणिक वर्षांची तयारी, नव्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया याची गडबड असणार आहे. १२० दिवसांत सर्व परीक्षा नियमित कामकाजासह घेणे अशक्यप्राय आहे. याचा विचार करता काळजी घेऊन तोंडी परीक्षा घेणेच श्रेयस्कर ठरेल, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments