मुंबई - राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे , सत्तेतला आमदार काही करु शकत नाही , विरोधी पक्षाचा आमदार प्रबळ असायला हवा . मी आज सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आलो आहे . या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी मागणी होत आहे . तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडली आहे . ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिलीच सभा सांताक्रुझ येथे पार पडली . यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की , खड्डयांमुळे लोकांचे बळी जात आहे . या सर्व शहरांचा विचका झाला आहे . निवडणुका येतात जाहिरनामे देतात , आश्वासने देऊन दिवसेंदिवस शहर बरबाद करतायेत . पुण्यासारख्या शहरात अर्धा - पाऊणतास पाऊस पडल्याने सगळे विस्कळीत होत असेल तर काय करणार ? पुण्यात नाही पाण्यात राहतो असं सांगा असं त्यांनी सांगितलं.तसेच शहरांचे नियोजन कोलमडलं , उमेदवार येणार मतदान करणार , वर्षानुवर्षे सुरु आहे. गेल्या ५ वर्षात सरकारला जाब कोण विचारतंय ? विरोधी पक्षनेतेच भाजपात गेले ? विरोधी पक्ष राहिला आहे का ? सरकारविरोधात तुमचे प्रश्न मांडणार कोण ? ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार कोण ? बँकांचे घोटाळे होतायेत , लोकं बँकांबाहेर जाऊन रडतायेत ? अनेक व्हिडीओ त्याचे समोर येत आहेत ? हक्काचे पैसे काढता येत नाही , पीएमसी बँकेच्या अधिकारपदावरील माणसं ही भाजपाशी निगडीत आहे असा आरोप राज यांनी केला. दरम्यान , शेतकरी , कामगार , महिला , तरुणांना नोकऱ्या नाहीत , दर ५ वर्षांनी यायचं तुमच्यासमोर घोषणा द्यायचा , जल्लोष करायचा मग संपलं , तुमच्यासमोर खडतर आयुष्य आहे , सरकार कसंही वागतात , या देशातील न्यायालयांमध्ये निर्णय मिळणार काही नाही ? हा प्रश्न आहे . सरकार , न्यायालय संगतमताने वागायला लागले की , तुमचा आवाज कोण ऐकणार ? वाहतूक कोंडी , रस्त्यावर खड्डे हे सगळं तुम्ही सहन करताय , तुमच्या जाणीवा मेल्या आहेत का ? तुम्ही कधी प्रश्न विचारणार ? जे तुम्ही बोललात ते झालं की नाही ? ज्याचा रोजगार आहे त्याचा रोजगार जातो , जो बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळत नाही , महाराष्ट्र अधोगतीला जात आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
ความคิดเห็น