मुंबई :- (वृत्तसंस्था) मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि आपल्या आक्रमक शैलीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारे नितीन नांदगावकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. मनसेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाही नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाणं पसंत केलं. त्यानंतर आता मनसेचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजू पाटील यांनी नितीन नांदगावकरांवर जोरदार टीका केली आहे.कोण नितीन नांदगावकर ? आमच्या पक्षामध्ये नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि आमच्यासारखे मनसैनिक आहेत,' असं म्हणत राजू पाटील यांनी नितीन नांदगावकर यांच्यावर निशाणा साधला. नांदगावकर यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेतून त्यांचा शिवसेना प्रवेश मनसे नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. मनसे का सोडली? नांदगावकरांचा खुलासा राज ठाकरेच माझे दैवत आहेत आणि राहतील, असं सांगत मनसे का सोडली, याचा खुलासा नितीन नांदगावकर यांनी केली. 'बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती असणाऱ्या बडव्यांमुळे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती. राज ठाकरे हे माझ्या दैवत आहेत आणि राहतील. पण त्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे मला मनसे सोडावी लागली,' असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला. मनसे वाहतुक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नितीन नांदगावकरांनी हाती शिवबंधन बांधलं. गेले काही वर्षे नितीन नांदगावकरांनी बेशिस्त ऑटो रिक्षा आणि टँक्सी चालकांना मारहाण केल्याने ते चर्चेत आहेत. आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न मांडल्यामुळे ते प्रवाशांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी काही काळ तडीपारही केलं होतं. तर नितीन नांदगावकर यांना मनसेचं विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट ही मिळणार होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments