चाळीसगांव :- (उपसंपादक) मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वैदेही पंडित यांच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक दिवसांपासून संभाजी सेनेने वरिष्ठांकडे तक्रारी देऊन देखील काही कार्यवाही होत नसल्यामुळे दिनांक १८/७/२०१९ रोजी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व शासकीय कार्यालय तसेच संबंधित पोलिस अधिकारी यांच्याकडे १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदने दिले होते परंतु तरीदेखील कुठल्या प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी साधारण १० वाजता संभाजी सेनेचे विभाग प्रमुख विजय रमेशराव देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे तहसील कचेरी आवारात हजर होऊन अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सदर वेळी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना थांबविले त्यानंतर संभाजी सेनेच्या असलेल्या तक्रारी वैदेही पंडित या वैद्यकीय अधिकारी मेहुणबारे येथे निवासी डॉक्टर असून देखील त्या तेथे निवासी राहत नसून चाळीसगाव येथे त्यांचा रहिवास आहे दिवसभरात जास्तीत जास्त ३ ते ४ तास मोठ्या मुश्कीलीने त्या मेहुणबारे रुग्णालयात थांबतात त्यानंतर डिलिव्हरी पेशंट आले की त्यांचे चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये पाठविण्याचा अट्टाहास करतात शिवाय सर्वसामान्य रुग्ण आले तरी जास्तीत जास्त १०८ रुग्णवाहिका बोलून पेशंट धुळ्याला रवाना करण्याचाच त्यांचा धडाका असतो तसेच त्या तिथे राहत नसल्यामुळे रात्री-बेरात्री जर एखादा रुग्ण किंवा डिलिव्हरी पेशंट आले तर तेथील शिपाई त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतात अशा अनेक तक्रारी आहेत तरी त्याबाबत जिल्हा सिव्हिल शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव जिल्हा जळगाव यांनी दूरध्वनीवरून दिलेल्या आदेशानुसार सूचनेनुसार मान्यतेनुसार वैद्यकीय अधिकारी वर्ग १ ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांनी सदर विषयाबाबत लवकरात लवकर चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल आणि म्हणून आपण आपले आंदोलन थांबवावे असे विनंती पत्र दिले आणि त्यावर पंधरा दिवसात जर कार्यवाही झाली नाही तर १ सप्टेंबर रोजी मा. संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार ११ संभाजी सैनिक आत्मदहन करतील असा इशारा पुन्हा देण्यात आलेला आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments