बुलडाणा:- (वृत्तसंस्था)बुलडाणा जिल्ह्यात सवत्र वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे झाड कोसळून एकाच घरातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील आनंद नगर येथे घरावर निबांचे झाड पडल्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात पावसामुळे मृत्यू होण्याची ही पाचवी घटना आहे.झाड अंगावर कोसळल्यामुळे आईसह 2 बालकांचा मुत्यू झाला आहे. शारदा गुणवंत हिरडकर (28 ) असं आईचं नाव आहे तर सुष्टी गुणवंत हिरडकर (3)आणि ऋषिकेश गुणवंत हिरडकर (2 )अशी मृत मुलांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या मदतीने या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पावसात सुरक्षा बागण्याची सुचना विभागात करण्यात आली आहे. एकाच घरातील तिघांनी पहिल्याच पावसात अशा पद्धतीने जीव गमावल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावातून यावर शोककळा व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, आज दुपारपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडत असल्याने, बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथील 22 वर्षीय युवकाने इतर लोकांबरोबर पावसापासून बचावासाठी पातूर ते शिर्ला मार्गावर झाडाचा आसरा घेतला. मात्र, दुर्दैवाने त्या ठिकाणी वीज पडली आणि अभिजित श्रीकृष्ण इंगळे हा युवक इतर लोकांसह गंभीर जखमी झाला.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Kommentare