top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

मुंबईत ६९२ नवे करोना रुग्ण, २५ मृत्यू, संख्या ११ हजार २०० च्या पुढे

वृत्तसंस्था:- मुंबईत ६९२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या ११ हजार २१९ इतकी झाली आहे. आज मुंबईत २५ मृत्यू झाले अशीही माहिती देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. मुंबईत आत्तापर्यंत ४३७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.मुंबईतल्या धारावीत आज नवे ५० रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे धारावीतली रुग्णसंख्या ७८३ झाली आहे. आज धारावीत एक मृत्यू झाला आहे. धारावीत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन २१ जणांचा मृत्यू झाला आहे.


4 views0 comments

Comments


bottom of page